लग्नाचे आमीष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१५: फिर्यादी महिला हिने फौजदारी चावडी पोलीस स्टेशन येथे तिच्या मामाचा मुलगा केशव प्रल्हाद नकाते, रा. आरळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर याच्याविरुध्द लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे अटकेच्या भितीपोटी सदर आरोपीने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत अटकपुर्व जामिन अर्ज सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला.

सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात हकिकत अशी की, फिर्यादी महिलेने सदर आरोपी केशव प्रल्हाद नकाते, रा. आरळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला व तसेच तिची फसवणूक केली असे आशयाची फिर्यादी दाखल केली.

त्यामुळे अटकेच्या भितीपोटी नकातेने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनीचा अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या युक्तीवादावेळी ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद मांडला की, दोन प्रौढांमधील शारिरीक संबंध हे स्वखुषीने असतील तर ते बलात्कारच्या व्याख्येमध्ये येणार नाहीत. तसेच आरोपीकडून काही एक जप्त करावयाचे नसल्यामुळे त्यास अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तीवाद मांडला. सदर मुद्दयांचा विचार करुन आरोपीस न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. शिरीष पवार यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here