जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर 

0
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

सोलापूर,दि.१४:  जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेला तिचा पती संतोष जगन्नाथ साबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

क्रेन घेण्यासाठी माहेरहुन २५ हजार रुपये का आणत नाही म्हणून मारहाण करुन रॉकेल ओतुन पत्नी मिनाक्षी हिचा खून केल्याच्या आरोपावरुन वैराग पोलिसांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. बार्शी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरुध्द आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत अपिल व जामीन अर्ज दाखल केला होता. 

सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमुर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपिठासमोर झाली. आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की सदर प्रकरणातील मयताच्या मृत्युपूर्व जबाबात विसंगती आहेत. त्यामुळे सदरचा विसंगतपुर्वक जबाब विश्वासार्ह्य नाही. अनेक दिवसापासून आरोपी हा कारागृहात बंदीवासात आहे त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र आहे. 

दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन खंडपीठाने आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिले. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने तर सरकारतर्फे ॲड. एस. एन. देशमुख यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here