एक्झिट पोलनुसार भाजपाला या मतदारसंघात बसणार मोठा धक्का

0

सोलापूर,दि.1: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे. टीव्ही 9 पोलस्ट्रॅटने महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमकं काय चित्र असेल याचे अंदाज वर्तवले आहेत.

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल.

भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार खालील मतदार संघात भाजपाला मोठा धक्का बसत आहे. (BJP is lagging behind in this constituency)

सोलापूर लोकसभा मतदारसंघ

टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या आघाडीवर आहेत तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. येथे प्रणिती शिंदे विजयी होण्याचा अंदाज आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत तर भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. येथे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर असून भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत. येथे निलेश लंके हे विजयी होण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे आघाडीवर असून भाजपाचे उमेदवार संजय मंडलिक हे पिछाडीवर आहेत. येथे छत्रपती शाहू महाराज विजयी होण्याचा अंदाज आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे आघाडीवर असून भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत. येथे शशिकांत शिंदे विजयी होण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर या आघाडीवर असून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ही पिछाडीवर आहेत. येथे प्रतिभा धानोरकर विजयी होण्याचा अंदाज आहे.

उत्तर मध्य मुंबई

उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड या आघाडीवर असून भाजपाचे उमेदवार उज्वल निकम हे पिछाडीवर आहेत. येथे वर्षा गायकवाड विजयी होण्याचा अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here