Accident: शिवशाही बसच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू ६ जण गंभीर जखमी

0

मुंबई,दि.५: Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) शिवशाही बसला भीषण अपघात (Shivshahi Bus Accident) झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील तपोवन कॉर्नर येथे ही घटना घडली आहे.

नाशिक-औरंगाबाद शिवशाही (Shivshahi Bus Accident) बस ही तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाखालील ४४ नंबरच्या खांबावर ही बस आदळली. तसंच एका दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत व्यक्तीबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

राज्यात याआधीही अनेकदा शिवशाही बसचा अपघात होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवशाही बसच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here