Accident On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

Accident On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

0

मुंबई,दि.18: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातात (Accident On Mumbai-Pune Expressway) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झाला आहे. (Maharashtra News)

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या इर्टीगा कारचा भीषण अपघात (Accident On Mumbai-Pune Expressway) झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात इर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. (Maharashtra News)

सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं :

  1. अब्दुल रहमान खान, 32 वर्षे, घाटकोपर
  2. अनिल सुनिल सानप
  3. वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी
  4. राहुल कुमार पांडे, वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई
  5. आशुतोष नवनाथ गांडेकर, 23वर्षे अंधेरी, मुंबई

गंभीर जखमी :

  1. मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्ष (चालक)
  2. अमीरउल्ला चौधरी
  3. दिपक खैराल

किरकोळ जखमी :

  1. अस्फीया रईस चौधरी, 25 वर्षे. कुर्ला, मुंबई


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here