Samruddhi Mahamarg-Accident: समृद्धी महामार्गावर कारच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू

0

बुलडाणा,दि.12: Samruddhi Mahamarg-Accident: समृद्धी महामार्गावर कारच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारला अपघात झाला. या अपघातात 2 लहान मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मारुती सुझुकी आर्टिगा गाडीचा भीषण अपघात | Samruddhi Mahamarg-Accident

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इथं मारुती सुझुकी आर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. वेगात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

भरधाव वेगात असलेली आर्टिगा कार अचानक चालकाकडून अनियंत्रित झाली. त्यामुळे कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला.

या अपघातात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here