Accident: भीषण अपघातात नववधूसह आठ जणांचा मृत्यू, लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात

0

नांदेड,दि.22: लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातात (Accident) नववधूसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे ऑटो (क्र.एम.एच.29-ए.आर.3229) आणि ट्रकचा (क्र.एम.एच.04-ए.एल.9955) भीषण अपघात (दि. 21) काल सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान झाला. अपघात आठ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे.

जारीकोट ता. धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा ता. उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा ता. उमरखेड येथे 19 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. त्यानंतर आज 21 रोजी मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे मॅजिक वाहनाने जाताना भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ सायंकाळी 6 वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय 20 वर्ष, रा. साखरा ता. उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (वय 30, रा. जामगाव ता. उमरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय 22 रा. साखरा), सुनील दिगंबर थोटे (वय 30 रा. चालगणी ता. उमरखेड) यांच्यासह अन्य एक (नाव समजु शकले नाही) अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्यासह सुनीता अविनाश टोकलवार (वय 40 वर्ष, रा उमरी जहागीर, ता. हदगाव), गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष रा. उमरी जहागीर ता. हदगाव ) अविनाश संतोष टोकलवार (वय 36 वर्षे, रा. उमरी जहागीर, ता. हदगाव), अभिनंदन मधुकर कसबे (वय 12 रा.वाजेगाव) यांच्यासह 6 जणांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here