मुंबई,दि.१४: मंत्रीपदाबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचक विधान केले आहे. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झाला नाही. अब्दुल सत्तार यांनी आज माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाबाबत सुचक वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्राला १८ तास काम करणारा मुख्यमंत्री भेटल्याचेही ते म्हणाले, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी आणि राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली.
‘माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ”ज्यांना आमदारांना एकनाथ शिंदेचा फोन जाईल, तो मंत्री बनेल, महाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी कामे अर्धवट राहिली होती. ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पूर्ण होत आहे. तसेच १९ किंवा २० जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.”
खासदारही संपर्कात
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले. ”एकनाथ शिंदे हे राज्यातील प्रमुख नेत्यापैकी एक आहे. शिवसेनेची अनेक खासदारही त्यांच्या संपर्कात आहे. हळू हळू सर्व कामे होत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.