मुंबई,दि.23: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी (Cyber Police) बेंगळुरूतून अटक केली. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) चाहता असल्याचा दावा करणाऱ्याने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला आदित्य ठाकरे कारणीभूत असल्याचे म्हणत चाहत्याने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी 8 डिसेंबर ला व्हाट्सॲपद्वारे (WhatsApp) दिली होती. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे.
आदित्य ठाकरे यांना धमकीचा व्हाट्सॲपद्वारे (WhatsApp) मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. धमकीचा मेसेज पाठवण्यापूर्वी त्याने आदित्य ठाकरे यांना तीन वेळा फोन केला होता, मात्र आदित्य ठाकरे यांनी फोन उचलला नाही.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केली. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा आरोपीने केला आहे. ठाकरे यांना त्याने मेसेज पाठवून धमकी दिली होती. तसेच त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू केला होता. आरोपी हा बेंगळुरूत होता. तेथून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.