Aaditya Thackeray On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, आदित्य ठाकरे म्हणाले…

0

मुंबई,दि.१८: Aaditya Thackeray On Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीवरून भाजपाने थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवर ठाकरे गटाची भूमिका काय असा सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना केला. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले… | Aaditya Thackeray On Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देऊन फुलं वाहण्याच्या कृतीविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन.”

शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक सल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील ३३ देशांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करून, त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे लोकांना दाखवून द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं.

दोन्ही गटाकडून वर्धापन दिनाच्या सुरू असलेल्या तयारीबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार आहोत. दुसरीकडे ज्यांची हकालपट्टी झाली आहे. सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो. त्यांनी (शिंदे गट) ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा. कारण जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. तोच दिवस त्यांनी साजरा करावा. त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली, हे त्यांनी लोकांना दाखवून द्यावं.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here