Aadhar आणि Pan ३१ मार्च पर्यंत करावे लागणार लिंक, अन्यथा होऊ शकतो दहा हजारांचा दंड

0

दि.२४: आधार कार्ड (Aadhar Card) पॅन कार्ड (Pan Card) ही महत्वाची कागदपत्र आहेत. अनेक ठिकाणी ही कागदपत्रे लागतात. सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठीही आधार कार्ड लागते. पॅन कार्ड, आधार कार्ड ही सरकारी कागदपत्रं ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी देखील उपयोगी येतात. सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे.

अशा स्थितीमध्ये या कालावधीत जर तुम्ही पॅन व आधार कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला १ हजार रुपये लेट फी द्यावी लागेल. याशिवाय रिटर्न न भरल्यास १० हजार रुपये दंड लावला जाईल. तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केल्यास सरकार तुमच्या आर्थिक व्यवहारांची सहज माहिती मिळवू शकेल. ज्यामुळे फसवणूक व टॅक्स चोरी रोखता येईल. पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सरकारने याआधी देखील अनेकदा वाढवली आहे. आता ही मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे PAN आणि Aadhaar Card लिंक नसल्यास त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. तुम्ही फोनवरून देखील ही प्रोसेस पूर्ण करू शकता.

पॅन-आधार SMS च्या माध्यमातून लिंक करू शकता

तुमच्या पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून UIDPAN <१२ डिजीट आधार नंबर> <१० डिजीट पर्मेनेंट अकाउंट नंबर> हे लिहून ५६७६७८ आणि ५६१६१ यावर एसएमएस करा. या प्रोसेसनंतर तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल. तसेच, आधीपासून पॅन आणि आधार कार्ड लिंक असल्यास तुम्हाला याबाबतची देखील माहिती मिळेल. म्हणजेच, तुम्ही एसएमएस पाठवून देखील तुमचे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन असे लिंक करा आधार आणि पॅन कार्ड

यासाठी सर्वात प्रथम इनकम टॅक्सची ई-फाइलिंग वेबसाइट http://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.

येथे डाव्या बाजूला क्विक लिंक्समध्ये ‘लिंक आधार’चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला आधार आणि पॅनशी संबंधित माहिती भरावी लागेल.

त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यानंतर आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here