Aadhaar Voter ID linking: मतदार ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड (Aadhar Card) लिंक होणार आहे, केंद्र सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तीन मोठे बदल केले आहेत. यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक (Aadhaar Voter ID linking) करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे.
20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. Aadhaar Card Voter ID कार्डशी लिंक करणं करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
सर्वात आधी राष्ट्रीय मतदार पोर्टल वेबसाइट https://voterportal.eci.gov.in/ वर जावं लागेल.
त्यानंतर मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वोटर आयडी नंबर आणि नव्या पासवर्डचा वापर करुन लॉगइन करा.
आता स्क्रिनवर नवं पेज ओपन होईल. इथे राज्य, जिल्हा, वैयक्तिक माहिती नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव टाका.
डिटेल्स भरल्यानंतर Search वर क्लिक करा. तुमची माहिती योग्य असल्यास स्क्रिनवर डिटेल्स दिसतील.
आता ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा.
आता पॉप-अप पेज ओपन होईल. तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल टाकावा लागेल.
सर्व डिटेल्स तपासून Submit वर क्लिक करा.