Aadhaar Card | UIDAI ने आधार कार्डबाबत दिली महत्वाची माहिती; तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं का?

Aadhar Card: UIDAIच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे

0

सोलापूर,दि.10: Aadhaar Card | UIDAI ने आधार कार्डबाबत महत्वाची माहिती दिली आहे. अनेक महत्वाच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. UIDAI ने आधार कार्ड अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला आता आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे. यूआयडीएआयने आधार कार्डबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आता यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे. या अपडेटसाठी आधार कार्ड धारकांना ओळखपुरावा आणि ॲड्रेस प्रूफ देणं बंधनकारक आहे. यूआयडीएआयने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

असे करा आधार कार्ड अपडेट | Do this for Aadhaar Card Update

आधार कार्डच्या ऑनलाइन http://uidai.gov.in पोर्टलवर भेट द्या. तिथे प्रोसेस टू अपडेट ॲड्रेस हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला नंबर अपलोड करा. तुम्हाला एक OTP येईल. तुमचा नंबर वैध असल्याचं त्यावरून समजेल. त्यानंतर Proceed to Update Address वर क्लीक करा.

तुमचा 12 अंकांचा आधार कार्ड नंबर अपडेट करा. सेंड OTP म्हणा आणि आलेला OTP तिथे पोस्ट करा. त्यानंतर update address via address proof पर्याय निवडा. तुम्ही याला पर्याय म्हणून Update Address via Secret Code हा देखील पर्याय निवडू शकता.

तुम्हाला ॲड्रेस प्रुफ डिटेल्स अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रुफसाठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. ते अपलोड केल्यानंतरच तुमचं आधारकार्ड अपडेट होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here