तरुणी सेल्फीच्या नादात 100 फूट खोल दरीत कोसळली आणि…

0

सातारा,दि.4: अनेकदा फोटो काढण्याच्या नादात दुर्घटना घडतात. फोटो काढताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकांना पर्यटन स्थळी गेल्यानंतर फोटोचा मोह आवरत नाही. साताऱ्यात सेल्फीच्या नादात एक तरुणी 100 फूट दरीत कोसळली होती. तेव्हा स्थानिक ट्रेकर्संनी रशीच्या सहाय्याने या तरुणीचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खटाव तालुक्यातल्या मायणी गावातून रुपाली देशमुख ही 29 वर्षीय तरुणी मित्र मैत्रिणींसोबत सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा फिरायला आली होती. तेव्हा बोरणे घाटावर ती सेल्फी काढत होती. सेल्फी काढताना तिचा तोल गेला आणि 100 फूट खाली दरीत कोसळली.

रुपाली खाली कोसळल्यानंतर तिच्या मित्र मैत्रिणींनी आरडा ओरड केली आणि स्थानिकांना मदतीसाठी बोलावले. स्थानिक ट्रेकर्संनी घटनास्थळी धाव घेतली. होमगार्ड अविनाश मांडे यांनी दोरीच्या सहाय्याने खाली गेले आणि जिवाची बाजी लावत रुपालीचे प्राण वाचवले.

जखमी रुपालीला जवळच्या रुग्णायलयात दाखल केले. रुपाली या अपघातात जखमी झाली होती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here