Viral Video: तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, चालत्या बसमध्ये चढली अशी

Viral Video: बसमध्ये चढण्यासाठी तिने केलेलं कृत्य पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

0

मुंबई,दि.19: Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. नको ते साहस जीवावर बेतू शकते. नको ते साहस करू नये. आजकाल लोकल बस किंवा ट्रेनने प्रवास करणं खूप अवघड झालं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे गर्दी. गर्दीमुळे लोकांना जागा मिळणं कठिण जात आहे. एवढंच नाहीतर उभं राहण्यासाठी जागा खूप कमीवेळा मिळते. अशा वेळी बस किंवा ट्रेनमध्ये चढणं खूप धोकायक झालं आहे. एवढ्या गर्दींमध्ये कोणी चेंगरला जावू शकतो. कधी कधी प्रवास जीवावरही बेतला जावू शकतो. अशा परिस्थितीत बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवण्याची धडपड लोक करताना पहायला मिळतात. गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपण करत असलेल्या लोकांचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

तरुणीचा व्हिडीओ व्हायरल | Viral Video

सध्या सोशल मीडियावर एक तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही मुलगी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. बसमध्ये चढण्यासाठी तिने केलेलं कृत्य पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. बस सुरु झाली असून बसमध्ये खूप गर्दी पहायला मिळत आहे. बसमध्ये चढायलाही जागा नसल्यामुळे मुलीने चक्क खिडकीचा वापर केला आहे, बस सुरु झाल्यानंतर मुलीगी खिडकीतून बसमध्ये चढली आहे. तिला पाहून सगळेच थक्क झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by memes comedy (@ghantaa)

तरुणी खिडकीतून बसमध्ये चढते

या व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की, हरियाणा रोडवेजची बस हळूहळू पुढे जाऊ लागली आहे. बसचे मागील व पुढील दरवाजे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अशा स्थितीत प्रवाशांना तेथून चढणे अवघड झाले. दरम्यान, एक तरुणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. खिडकीच्या आत काही व्यक्ती आधीच बसलेले आहे. आत बसलेली व्यक्ती मुलीचा हात धरते आणि तिला बसमध्ये खेचते. ती मुलगीही कसेतरी पाय वर करते आणि पटकन खिडकीतून बसमध्ये शिरते. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

दरम्यान, मुलीच्या हिंमतीची सगळेच दाद देत आहेत. मात्र असा स्टंट करणं खूप धक्कादायक असून जीवावरही बेतू शकतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ फिरत असून यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here