लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, Video

0

दि.6: लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा Video व्हायरल होत आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या सतत सुरू असतात मात्र, असे असले तरी प्रवाशांची गर्दी इतकी असते की अनेकदा वाद होतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे.

बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. लोकलमधील बसण्याच्या आसनवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या. यावेळी कोपरखैरणे येथे महिला चढली. यानंतर तुर्भेत जागा झाली.

यामुळे ती बसली असता छोट्या मुलीला बसू दिलं नाही, यावरून शाब्दिक बाचाबाची होत असताना याचं रूपांतर मारामारीत झालं. या लोकलमध्ये नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असतात त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली आहे. यासंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या माय लेकीवर गुन्हा दाखल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here