Leopard Attack Video: चित्त्याने सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीवर केला अचानक हल्ला, Video व्हायरल

0

Leopard Attack Video: चित्त्याने (Leopard) सायकलवरून चाललेल्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जून 2022 च्या जुन्या क्लिपने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही क्लिप IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केली आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

क्लिपची सुरुवात एका व्यक्ती एका जंगलातून जात असलेल्या महामार्गावरून सायकलवरून जात आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक चित्ता (बिबट्या) झुडपांतून उडी मारून माणसावर झेपावताना दिसत आहे. मात्र, तो माणूस सुखरूप निसटला आणि बिबट्याही पुन्हा जंगलात पळून गेला. (Leopard Attack Video)

हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. बिबट्याचा अचानक हल्ला पाहून लोक अचंबित झाले. ही घटना आसाममध्ये घडल्याचे अनेकांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here