मुंबई,दि.27: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जाणाऱ्या बसला आग लागली. या बसमध्ये 36 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीची ही बस मुंबईहून पुण्याकडे जात होती. बस वडगाव पोलीस ठाण्यांतर्गत आडे गावात येताच तिचा टायर फुटला. बसमध्ये शॉर्टसर्किटही झाले. शॉर्टसर्किटमुळे बसला भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच बसमधील सर्व प्रवासी बाहेर आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
बसला आग लागल्याची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. बसला आग लागल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. आग विझवल्यानंतर महामार्ग पुन्हा खुला करण्यात आला.