प्रयागराज | शिक्षकाने मारल्यामुळे 10वीचा विद्यार्थी शाळेच्या दप्तरात पिस्तूल घेऊन गेला

0

प्रयागराज,दि.31: प्रयागराजच्या संगम नगरात एक विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे 10वीचा एक विद्यार्थी बेकायदेशीर शस्त्रांसह शाळेत पोहोचला, पण शाळेत तपासणीदरम्यान पकडला गेला. शाळेतील शिक्षकाने मुलाला पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस आता या मुलाकडून अवैध शस्त्रास्त्राची माहिती गोळा करत आहेत. हे प्रकरण सोरांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

शिक्षकाने मारल्यामुळे 10वीत शिकणारा एक विद्यार्थी गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला. त्याला त्या शिक्षकाला मारायचे होते, पण सुदैवाने शाळेत तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिस्तुल पकडली गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दालपूर खास येथील एका शाळेत 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाच्या बॅगेत अवैध पिस्तूल आढळली. पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात अशी चर्चा आहे की, शाळेतील शिक्षकाने त्या मुलाला शाळेत सर्वांसमोर मारले आणि कोंबडा होण्याची शिक्षा दिली. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाला मारहाण्याचा डाव आखला.

बॅगमध्ये पिस्तूल आढळल्यानंत शाळेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षकांनी तात्काळ त्या मुलाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने हे अवैध शस्त्र दुसऱ्या एका मुलाकडून विकत घेतल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here