तर वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; राज्याचे अपर पोलीस महासंचालकांनी काढले परिपत्रक

0

मुंबई,दि.3: वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुमच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच आता वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केलं असून वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन वा त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असं न झाल्यास वाहतूक पोलिसांनाच दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करू नये. जर कोणी खाजगी मोबाईलचा वापर केला तर कारवाई होणार.

काही अधिकारी आणि अंमलदार ई-चलान मशिनद्वारे कारवाई ना करता आपल्या खासगी मोबाइलवर फोटो काढतात अशा स्वरुपाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फक्त चलान मशिनद्वारेच फोटो काढणे अपेक्षित आहे. असं न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई होणार.

वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाड़ी कोणती आहे ओळखणे अशक्य होते.

पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकडील ई चलान मशिनबाबत काही समस्या, अडचणी असल्यास तशी तक्रार द्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here