सोलापूर जिल्ह्यातील मौजे कोन्हाळीच्या सरपंचाच्या पतीवर अत्त्याचार फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.१ एप्रिल २०२२: सोलापूर जिल्ह्यातील महिला सरपंचाच्या पतीवर बलात्कार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी येथील सरपंच सुमित्रा बाबुराव बनसोडे यांचे पती बाबुराव बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर पीडित महिलेला लग्नाची आणि मुलांची सांभाळ करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी येथील बाबुराव बनसोडे हे मुंबई येथे सरकारी नोकरीत असून त्यांचे गावातील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. पीडिताचा मुंबईमध्ये शारीरिक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीचे पती मयत असून त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले आहेत. फिर्यादी घरकाम करते. त्यांचे व आरोपी यांचे सन 2012 मध्ये ओळख झाले असून तेंव्हापासून अनेक पद्धतीचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विनवणी करत होता. त्याला भुलून बळी पडल्याचे फिर्यादी महिला यांचे म्हणणे आहे.

फिर्यादी महिला देखील मौजे कोन्हाळी, ता.अक्कलकोट येथील रहिवासी असून गावातील नातेवाईक यांच्या लग्नासाठी गावी आली असता आरोपीने भेटण्यास व कॉल उचलण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने आरोपीच्या मुंबई येथील घरी जाऊन जाब विचारल्यावर शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी बाबुराव बनसोडे यांचे राजकीय पक्षातील अनेक आमदार व पुढारी यांच्याशी ओळख असल्याने त्यांनी राजकीय दबाव आणून त्रास देण्याची आणि जीवाला धोका असण्याची भीती असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सध्या ठाणे पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here