सोलापूर,दि.१३: वहिवाटीचा रस्ता खुला करुन मिळण्याकरिता तहसीलदारांकडे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या लाचलुचपत तलाठ्याविरुद्ध प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. समाधान ( वय ३३, बाळासाहेब काळे रा. समर्थनगर, अक्कलकोट ) असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे येथे तक्रारदाराची शेतजमीन असून शेतमालाची ने – आण करण्याकरिता वहिवाटीचा रस्ता खुला करुन मिळण्याकरिता तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी होऊन वरिष्ठांकडून तक्रारदारांच्या बाजूने निकाल लावून निकालाची प्रत देण्याकरिता तलाठी काळे याने एकूण २५ हजारांच्या लाचेची मागणी केली.
त्यातील पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये मागणी केली. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे सदर तलाठी काळे याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या पथकाने केली.