शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.30: शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड येथे करण्यात आलेले आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असं लिहिलेले फोटो आणले होते.

मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. 

अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये…जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. तर,  आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप आव्हाडांविरोधात करण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणीही आव्हाडांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर आव्हाड यांच्याविरोधता गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे.  भादवि कलम 153 153 अ 295 504 व 505 अन्वये कलमा नुसार कारवाई


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here