भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

0

पुणे,दि.6: भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुनील कांबळे यांनी काल (दि.5) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली होती. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला होता. पुणे येथे ही घटना घडली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमात मारहाणीची घटना घडली. राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण आवाक झाले.

आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये बातम्या आल्या. विरोधकांनी टीका केली. त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल

सुनील कांबळे यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला होता. पोलीस कर्मचारी शिवाजी सरक असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधकांकडून सुरु झालेल्या टीकेनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here