Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल

0

हिंगोली,दि.28: Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला (Principal) मारहाण करणं बांगर यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांसह इतर 30 ते 40 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला केली होती मारहाण | Santosh Bangar

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण करणं बांगर यांना चांगलच भोवलं आहे. त्या ठिकाणी आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण? | MLA Santosh Bangar

कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली (Hingoli) शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते.

Santosh Bangar
आमदार संतोष बांगर

पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ

संतोष बांगर वादांमुळे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी संतोष बांगर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. 27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरुन मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते. मात्र याचवेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. या कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची नोंद पोलीस डायरीत केली होती.

संतोष बांगर म्हणाले…

दरम्यान, या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला होता. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळं माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here