४० वर्षीय महिला शिक्षिका १६ वर्षीय विद्यार्थ्याला हॅाटेलमध्ये घेऊन जायची आणि…

0

मुंबई,दि.२: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील ४० वर्षीय महिला शिक्षिकेला १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले जिथून तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत असे कृत्य केले आहे का हे शोधण्यासाठी तिची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. तपास अधिकाऱ्याने न्यायालयात युक्तिवाद केला की पुरावे गोळा करण्यासाठी आणि इतर संभाव्य पिडीतांची ओळख पटविण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. महिलेची जोडीदार आणि मित्र अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध घेतला जात आहे.

महिला शिक्षिकेच्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला समजावले 

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहित इंग्रजी शिक्षिका विद्यार्थ्याला आलिशान हॉटेल्समध्ये घेऊन जाऊन त्याचे शोषण करत असे. पोलिसांनी सांगितले की, डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान शिक्षिकेची भेट विद्यार्थ्याशी झाली होती. त्यानंतर, जानेवारी २०२४ मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याशी अनुचित वर्तन करण्यास सुरुवात केली. शिक्षिकेच्या एका मैत्रिणीनेही विद्यार्थ्याला हे बेकायदेशीर संबंध स्वीकारण्यास उद्युक्त केल्याचा आरोप केला आणि सांगितले की, आजकाल अशा घटना सामान्य झाल्या आहेत. या मैत्रिणी विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका विद्यार्थ्याला महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जायची आणि तिथे त्याचे लैंगिक शोषण करायची. अनेक वेळा ती विद्यार्थ्याला नशा करण्यासाठी दारू पाजायची आणि त्याला चिंताविरोधी औषधे द्यायची. या शोषणामुळे विद्यार्थ्याला तीव्र चिंता आणि तणावाचा सामना करावा लागत होता.

विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल दिसून आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला ही घटना कळली. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले, कारण त्याला वाटले की शाळा संपल्यानंतर हे प्रकरण संपेल. तथापि, विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि शाळा सोडल्यानंतरही, शिक्षिकेने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांच्या घरकाम करणाऱ्या नोकराद्वारे विद्यार्थ्याला मेसेज पाठवले, त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध पॉक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here