दि.१३ः एमआयएम पक्षाचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत जाहीर आव्हान दिलं आहे. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
भाजपा-मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणेपाठोपाठ मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ असं म्हटलं आहे.
याआधी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“महाराष्ट्रातील हिंदूंना, शिवप्रेमींना नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न होता. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे लचके तोडले, आपल्या आई-वडिलांनाही सोडलं नाही, अत्याचार केले त्याच्या कबरीसमोर तुमच्या छातीवर उभं राहून नतमस्तक होतो आणि महाराष्ट्रातून दोन पायावर निघून जातो हा संदेश द्यायचा होता का? हा संदेश मिळाल्यानंतर ठाकरे सरकार ज्यांना हनुमान चालीसा चालत नाही, जय श्रीराम चालत नाही…लगेच देशद्रोहाचे गुन्हे टाकतात त्यांनी २४ तास उलटले असतानाही या प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केलेला नाही?,” अशी विचारणा नितेश राणे यांनी टीव्ही ९ शी बोलताना केली आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, औवेसी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमं लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार असा टोला लगावला आहे.
तसेच ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेऊन हिंदुना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केलं तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.
अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझ थडगं आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त आहे. अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.