NIA ची मोठी कारवाई 20 ठिकाणी छापे, दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई

0

मुंबई,दि.9: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. मुंबईत आज जवळपास 20 ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली आहे. ही सर्व ठिकाणं दाऊदचे शार्प शूटर्स, ड्रग्ज पेडलर्स यांच्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय दाऊदच्या हवाला ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दाऊदशी निगडीत मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर काही ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. फेब्रुवारीमध्या या संदर्भात नोंद घेण्यात आली होती. आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here