सांगली,दि.6: केंद्रीयमंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भाजपा मनसे युतीवर स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी विरुद्ध भूमिका घेतली आहे. भाजपाचे कौतुक राज ठाकरे करत आहेत. यामुळे भाजपा मनसे युतीची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेच्या मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका मांडलीय, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडलंय. सांगलीच्या आटपाडी मधे ते पत्रकाराशी संवाद साधत होते.
मी असताना मनसेची गरज नाही
मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, महाराष्ट्र मध्ये भाजप आणि आरपीआय सोबत येत सत्ता आणूया आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे असे आठवले म्हणालेत.
कोरेगाव भीमा मध्ये झालेली दंगल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पध्द्तीने हाताळली होती, त्यामुळे या दंगलीचे महाराष्ट्र मध्ये कुठेही पडसाद पडले नव्हते, शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही. भाजप सरकारने दंगल वाढवण्याचा विषय येत नाही, जरी भाजपचं सरकार असलं तरी दंगल करणारे भाजपचे लोक नव्हते. दंगलीत स्थानिक लोक होती, त्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षाचीही लोक होती असे आठवले म्हणालेत.
महाराष्ट्रात दुसरा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा
रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात दुसरा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा होईल. आणि तो मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, सक्षम असणारे नेतृत्व आहे, मागील 5 वर्षात भाजपला ताकद देण्याचं काम त्यांनी केलंय. राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, ती समाजात वाद निर्माण करणारी आहे, राज यांची भूमिका सामाजिक नसून धार्मिक आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये राज ठाकरे यांना विरोध होत असावा असे आठवले म्हणालेत.
भोंगा वादावरून रामदास आठवले म्हणाले होते की, सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत असे माझे मत असल्याचे आठवले म्हणाले. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही. मी मनसे सांगतो की आम्हाला मनसेची अवशक्यता नाही. नरेंद्र मोदी यांची स्वतःची प्रतिमा आहे. चुकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणार देखील नाही, भाजप स्वतः सक्षम असल्याचे आठवले म्हणाले.