दि.१०: Sanjay Raut On Assembly Elections 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2022) मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पूर्ण बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आघाडीवर आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपा आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 403 जागांपैकी 257 जागांवर आघाडीवर आहे.
योगी आदित्यनाथ पुढे जाणार हे नक्की होतं – संजय राऊत
योगी आदित्यनाथ पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले आहेत.