Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं स्पष्टीकरण

0

जळगाव,दि.28: Shivaji Maharaj: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. सोलापूरात शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत निदर्शने केली. राज्यात अनेक ठिकाणी या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या विधानाबाबत कोश्यारी यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोशारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कोशारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, अशी माझ्याकडे माहिती होती. मात्र इतिहासकारांनी दूसरी तथ्य देखील सांगितली आहे, त्याबाबत देखील मी माहिती घेईल, असं स्पष्टीकरण कोश्यारी यांनी यावेळी दिलं.

दरम्यान,  ‘राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे,’अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

अमुक एक नसते तर शिवाजी महाराज घडले नसते, असं कोश्यारी म्हणालेत; पण ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, त्यांनी इतिहास वाचला असता तर ते तसे बोलले नसते. एखाद्याचा हात पकडू शकतो. तोंड नाही. शब्द हे शस्त्र असतात. ते समजून बोलावे. वयाने ते मोठे आहे, निदान त्यांनी तरी वक्तव्य मागे घ्यावे. अनेकांचे फोन आले. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here