दि.27: Reliance On Big Bazaar: किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर ग्रुपच्या रिटेल स्टोअरबद्दल (Future Retail Ltd) मोठी बातमी येत आहे. रविवारी कंपनीची मॉल बंद राहिली. दरम्यान, अशा बातम्या येत आहेत की रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance industries) कंपनीची अनेक दुकाने ताब्यात घेणार आहे.
देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. रविवारी कंपनीची बहुतांश स्टोअर्स बंद राहिली. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance industries) फ्युचर ग्रुप (Future Group) ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज फ्युचर स्टोअर्सचे रीब्रँडिंग करणार
फ्युचर ग्रुप स्टोअर्सच्या जागेचे भाडे देण्यास असमर्थ ठरला आणि यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज आता किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर ग्रुपच्या त्या रिटेल स्टोअर्सचे पुनर्ब्रँडिंग करेल. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनाही नोकऱ्या देऊ केल्या आहेत. ज्या स्टोअर्सचं भाडं देण्यास फ्यूचर ग्रूप असमर्थ ठरला आहे अशा सर्व स्टोअर्सचा ताबा आता रिलायन्स घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
रविवारी Big Bazaar चे बहुतांश स्टोअर्स बंद होती
खरंतर रविवार म्हटलं की ‘बिग बाजार’मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण आज फ्यूचर ग्रूपचे अनेक ‘बिग बाजार’ स्टोअर बंद असल्याचं दिसून आलं आहे. तसंच कंपनीच्या वेबसाइटवरही ग्राहकांना ऑर्डर देता येत नाहीय. वेबसाइट सुरू करताच संबंधित संकेतस्थळ अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे असा मेसेज दाखवत आहे. त्यामुळे ‘बिग बाजार’चं उद्यापासून नवं रुपडं पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
Home व्यापार-उद्योग आज Big Bazaarची बहुतांश स्टोअर्स बंद, उद्या नवीन रूपात पाहायला मिळणार? Relianceची...