Raveena Tandon: बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, न्याय देण्याची अभिनेत्री रविना टंडनची मागणी

0

मुंबई,दि.22: Raveena Tandon: कर्नाटकात (Karnataka) हिजाबवरून (Hijab Controversy) वाद सुरू आहे. हिजाब वादामुळे कर्नाटकात तणावाचं वातावरण असताना एका बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या (Bajrang Dal Activist Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
शिवमोगा येथे बंजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणात हिजाब वादाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे देशभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अभिनेत्री रविना टंडनही (Raveena Tandon) या घटनेवर ट्विट केलं आहे. 

हेही वाचा Bajrang Dal Activist Murder: हिजाबविरोधी पोस्टमुळे बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव हर्षा असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. हर्षाने आपल्या फेसबुकवर हिजाबविरुद्ध पोस्टी केली होती, त्याने भगवा शालीचं समर्थन केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्याप्रकरणानंतर शिवमोगा येथे तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 

अभिनेत्री रविना टंडन आणि चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी या घटनेबद्दल ट्विट करुन न्यायाची मागणी केली आहे. ट्विटरवर हॅशटॅग ‘जस्टीस फॉर हर्षा’ हा ट्रेंड होत असून मुंद्रा यांनी ही मॉब लिचिंग असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटन आणि मसान या चित्रपटांसाठी मुंद्रां यांची ओळख आहे. तर, रविनाने कवेळ #JusticeForHarsha असे टाईप करत न्यायाची मागणी केली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here