Buisness Idea: महिन्याला 80000 हजार रुपये पर्यंत करू शकता कमाई, गुंतवणूक फक्त 4000 हजार रुपये

0

दि.17: Buisness Idea: कोरोनामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, मात्र गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम असल्याने अनेकजण व्यवसाय करू शकत नाहीत. मात्र कमी कमी गुंतवणुकीत जास्त रुपये कमवण्याची संधी IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) देत आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ही रेल्वेची सेवा आहे. याद्वारे रेल्वे तिकीट बुकिंगपासून (IRCTC ticket booking ) अनेक सुविधा पुरवल्या जातात. आयआरसीटीसीच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तिकीट एजंट (Ticket Agent) व्हायचं आहे. ही एजन्सी तुम्ही घेतलीत की, ज्याप्रमाणे प्रवाशांना रेल्वे काउंटरवर (railway counters) पैसे दिल्यानंतर क्लर्क तिकीट देतो, त्याचप्रमाणे तुम्हालाही प्रवाशांना रेल्वेचं तिकीट देता येईल.

असे व्हा तिकीट बुकिंग एजंट

तुम्हाला तिकीट बुकिंग एजंट होण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल. त्यानंतर तुम्ही तिकीट बुक करू शकता. एजंटला तिकिटांच्या बुकिंगवर चांगले कमिशन मिळते. कोणत्याही प्रवाशाचे नॉन-एसी कोचचे तिकीट बुक करण्यासाठी प्रतितिकीट 20 रुपये आणि एसी क्लासचे तिकीट बुक करण्यासाठी 40 रुपये प्रतितिकीट कमिशन दिलं जातं. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या 1% रक्कमही एजंटला दिली जाते. आयआरसीटीसीचे एजंट होण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये किती तिकीटं बुक करता येतील, याबाबत कोणतीही मर्यादा नाही. एका महिन्यात तुम्हाला हवी तेवढी तिकिटं तुम्ही बुक करू शकता. याशिवाय 15 मिनिटांत तत्काळ तिकीट बुक करण्याचाही पर्याय आहे. एजंट म्हणून तुम्ही रेल्वे व्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकिटं बूक करू शकता.

महिन्याला कमवा 80 हजार रुपये पर्यंत

एका महिन्यात एजंट किती तिकिटं बूक करू शकतात, यावर मर्यादा नाही. त्यामुळे जास्तीतजास्त तिकिटं बूक करुन एजंटला मोठ्या प्रमाणात कमिशन कमवण्याची संधी असते. एजंटना प्रत्येक बुकिंग आणि व्यवहारावर कमिशन मिळते. या माध्यमातून एजंट दरमहा जवळपास 80,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतो. कामाचा वेग कमी असेल तरी सरासरी 40 ते 50 हजारांची कमाई होऊ शकते.

एजंट होण्यासाठी इतका येईल खर्च

जर तुम्हाला एका वर्षासाठी एजंट व्हायचं असेल तर आयआरसीटीसीकडे 3,999 रुपये शुल्क भरावं लागेल. दोन वर्षांसाठी हे शुल्क 6,999 रुपये आहे. तसंच एक एजंट म्हणून, एका महिन्यात 100 तिकिटं बूक केल्यानंतर प्रतितिकीट 10 रुपये शुल्क द्यावं लागेल. तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिटं बूक केल्यानंतर प्रतितिकीट 8 रुपये आणि एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटं बूक केल्यास प्रतितिकीट 5 रुपये शुल्क द्यावं लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here