दि.११: Wordle game: अनेकांना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय असते. अनेकजण वेळात वेळ काढून गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी काही खास वय नसते. गेममुळे अनेक जणांचे नुकसान झाल्याचे ऐकले असेल. मात्र कधी गेम खेळण्याच्या सवयीमुळे एखाद्याचे प्राण वाचल्याचे कधी ऐकले नसेल. अमेरिकेच्या शिकागो इथं वर्डले (Wordle game) गेमनं एका वृद्ध महिलेचा जीव वाचला आहे. महिलेने त्या व्यक्तीला तिच्याच घरात बंद करुन ठेवले होते. रोजप्रमाणे तिने गेमचा रिझल्ट शेअर केला नाही म्हणून महिलेच्या कुटुंबाला संशय आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहचली तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. पोलीस वेळीच पोहचल्याने महिलेचा जीव वाचला.
८० वर्षाच्या डेनिस होल्टनं पोलिसांना सांगितले की, ५ फेब्रुवारीला रात्री एक व्यक्ती खिडकी तोडून तिच्या घरात घुसला होता. त्या माणसाने मला खोलीत डांबून ठेवले. त्याने कपडेही घातले नव्हते. शरीरावर वेगवेगळ्या भागात कापल्याच्या खूणा होत्या. त्यातून रक्त वाहत होते. युवकाची ओळख ३२ वर्षीय जेम्स एच डेविस रुपानं झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, डेविसची मानसिक अवस्था ठीक नाही. डेविस घरात शिरल्यावर सुरुवातीला मला काहीही नुकसान पोहचवणार नाही असं म्हटलं. मात्र त्यानंतर त्याने मला खेचून एका खोलीत डांबलं. कदाचित मी वाचणार नाही असं मला वाटल्याचं होल्ट म्हणाल्या.
दुसरीकडे होल्टची मुलगी मेरेडिथ होल्ट यांनी सांगितले की, ती सिएटलमध्ये राहते आणि रोज तिची आई वर्डले गेमचं स्कोअर पाठवते. त्यादिवशी आईनं स्कोअर पाठवला नाही. तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं मला वाटलं. कारण आई कधीही स्कोअर शेअर करायला विसरत नाही. त्यानंतर मुलीनं शिकागो पोलिसांना फोन केला आणि सगळी माहिती दिली.
मुलीच्या फोननंतर पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहचले तेव्हा होल्ट यांना डांबून ठेवल्याचं त्यांना आढळलं. पोलिसांनी महिलेची सुटका केली. त्यानंतर १ तासांत आरोपी डेविसला ताब्यात घेतले. डेविसवर याआधीही अनेक आरोप लागले आहेत. त्यात अपहरणाचेही गुन्हेही नोंद आहेत.