Mumbai Fire: मुंबईत 20 मजली इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी

0

मुंबई,दि.22: Mumbai Fire: मुंबईत (Mumbai) आज (शनिवार) सकाळी एका 20 मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली असून, त्यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर अन्य 12 जखमींची प्रकृती स्थिर आहे. (Mumbai Fire)

मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. सध्या आग नियंत्रणात असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मात्र या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरातील शाळा सुरू न करण्याचा महापालिकेचा निर्णय

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. तसेच मुंबईच्या महापौर आणि स्थानिक आमदारांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सहा वृद्धांना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग नियंत्रणात असली तरी धूर प्रचंड होता. सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे. 

कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here