सोलापूर,दि.21: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Covid Third Wave) सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Solapur) दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद काल (दि.20) झाली होती. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 561 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 178842 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 172708 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2450 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3684 झाली आहे. यात 2392 पुरुष व 1291 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2080 अहवाल प्राप्त झाले. यात 1619 निगेटिव्ह तर 561 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 351 पुरुष आणि 210 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 210 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/img_20220121_1634035730218342270914058-677x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/img_20220121_1634245153285925085625022-739x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/img_20220121_16344468800166817619627-705x1024.jpg)