Home सोलापूर वार्ता आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना १३९ व्या...

आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना १३९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

0

सोलापूर,दि.२३: येथील ‘आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ यांच्या वतीने शिक्षण महर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात व आदराने अभिवादन करण्यात आले.

ग्रामीण व बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून शैक्षणिक क्रांती घडवून आणणाऱ्या कर्मवीर अण्णांचे कार्य व विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या त्यागमयी आणि समर्पित जीवनकार्याचे स्मरण करत उपस्थितांनी अण्णांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.

या अभिवादन कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक कुणाल बाबरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमोल गोडसे, स्नेहल गडहिरे, सुमित शिवशरण, शेरा तुळसे, आनंद बनसोडे, पप्पू लोंढे, कपिल बाबरे, श्रीकांत वाघमोडे, श्रीशैल हिरेमठ आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.