दि.15: Snake Viral Video: साप (Snake) म्हटले तरी अनेकांना घाम येतो. साप इतके धोकादायक असतात की त्यांचे नाव ऐकताच लोकांच्या अंगावर काटा येतो. आणि एखाद्याला महाकाय साप दिसला तर त्याची हवा टाईट होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महाकाय साप दिसत आहे आणि एक व्यक्ती त्याला हाताने पाणी देत आहे. व्हिडिओ पाहताच तुमच्या हृदयाची गती वाढेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या तळहाताने सापाला कसे पाणी देत आहे. व्हिडीओत जे दिसत आहे, ते पाहून कोणीही आपल्या हाताने नागाला पाणी देऊ शकेल, अशी कल्पनाही करू शकत नाही. व्हिडिओ पाहून हा साप त्या व्यक्तीचा पाळीव साप आहे, असे वाटते.
इन्स्टाग्रामवर @snakes.empire या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्यक्ती मूर्ख आहे का, साप कधीच माणसांचा मित्र असू शकत नाही आणि तो त्याला पाणी देत आहे.’ दुसरा वापरकर्ता म्हणतो की, विषारी सापही पाणी पिताना खूप सुंदर दिसतो.