दि.13: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. अनेक व्हिडीओ (Funny Video) मजेशीर असतात. प्राण्यांचे व पक्षांचे (Birds) अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मानवांना पक्षाची भाषा कळत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ अनेकवेळा मनोरंजन करतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पक्षांची महत्वाची बैठक सुरू असल्याचे वाटते.
असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, हा पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल. तुम्ही पाहिलं असेल, की जर एखाद्या विषयावर माणसांमध्ये बैठक असेल, तर त्या बैठकीत अनेक लोक जमतात आणि आपले विचार ठेवतात. पण कधी पक्षांची पाहिलीये का? व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येईल.
पक्षी बोलतायत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही पक्षी एका जागी बसून त्यांच्या आवाजात काहीतरी बोलत आहेत. त्यांच्याकडे बघून जणू काही महत्त्वाची बैठक होतेय, असं वाटतं. ते एकमेकांकडे बघून खूप बोलतात आणि काही तरी मान्य केल्यासारखं डोकं हलवतात.
IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘भाषा कोणतीही असो, हे स्पष्ट आहे की एका महत्त्वाच्या विषयावर आपत्कालीन बैठक सुरू आहे’. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय.