सोलापूर,दि.२९: मे महिना संपायला अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असून, तीन दिवसांनंतर म्हणजेच १ जूनपासून (Rule Change From 1st June) देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. नवीन महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून लागू होणारे हे नियम तुमच्या घराच्या स्वयंपाकघरापासून ते बँकेतील ठेवींपर्यंत थेट परिणाम करणार आहेत. या बदलांमुळे (Rule Change) थेट सर्वसामान्यांच्या खिशावर म्हणजेच बजेटवर परिणाम होऊ शकतो. या यादीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींपासून ते हवाई प्रवासावर परिणाम करणाऱ्या एटीएफ (ATF) च्या किमतींपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय सोलर पॅनेलच्या किमती वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया, १ जून २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या अशाच ५ मोठ्या बदलांविषयी…
१. एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलणार (LPG Cylinder Price)
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑइल मार्केटिंग कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये बदल करतात आणि नवीन किमती जाहीर करतात. जून महिन्याच्या पहिल्या तारखेलाही एलपीजीच्या किमतींमध्ये (LPG Cylinder New Rates) मोठा फेरबदल पाहायला मिळू शकतो.
२. विमान प्रवास महागणार की स्वस्त? (ATF Prices)
एलपीजी सिलिंडरप्रमाणेच विमान इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किमतीही दर महिन्याच्या १ तारखेला सुधारित केल्या जातात. ऑइल कंपन्यांनी एटीएफचे दर वाढवले, तर विमान कंपन्या तिकिटांचे दर वाढवू शकतात, ज्यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो.
३. एचडीएफसी बँक स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (HDFC Bank Special FD)
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या विशेष मुदत ठेव (Senior Citizen Care FD) योजनेची मुदत वाढवली होती. आता या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२६ असून, जूनपासून ही योजना बंद होऊ शकते.
४. सोलर पॅनेलच्या किमती वाढण्याची शक्यता (Solar Panel Price Increase)
सरकारने घेतलेल्या एका नव्या निर्णयानुसार, आता देशात मंजूर उत्पादक आणि मॉडेल्सच्या सूचीमध्ये (ALMM Order) समाविष्ट असलेल्या सोलर पॅनेलचाच वापर करणे बंधनकारक असणार आहे. सौर उत्पादनांची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे सोलर पॅनेलच्या किमती वाढण्याची (Solar Panel Price) दाट शक्यता आहे.
५. जून महिन्यात बँकांना सुट्ट्यांची जत्रा (Bank Holidays in June)
जून महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या (RBI Bank Holiday List) असणार आहेत. मोहर्रम आणि संत गुरु कबीर जयंती यांसारख्या सणांमुळे, तसेच दुसऱ्या-चौथ्या शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. १५, २५, २६, २९ आणि ३० जून या दिवशी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अर्थात, या काळात २४ तास ऑनलाईन बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील.





