सिम कार्ड पोर्टबाबत बाबत नवा नियम जारी,आता 1 रुपयांत करता येणार पोर्ट

1

दि.25 : मोबाईल नंबर पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना फायदा झाला आहे. ग्राहक आपला फोन नंबर न बदलता ऑपरेटर बदलू शकतो. सरकारने मोबाइल नंबर, टेलिफोन कनेक्शनशी संबंधित काही नियमांत बदल केले आहेत. आता कोणताही नवा मोबाइल नंबर घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटलरित्या होणार आहे. पोस्टपेड, प्रीपेड, सिम कार्ड पोर्ट करणं अशा कामांसाठी KYC करताना कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखालील कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.

सरकारने मोबाइलसंबंधी नियमांत बदल करुन Self KYC ची परवानगी दिली आहे. हे KYC App आधारे होईल. या e-KYC साठी केवळ 1 रुपये चार्ज द्यावा लागेल.

KYC साठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांकडे काही डॉक्युमेंट्स मागतात, त्यासाठी ग्राहकांना टेलिकॉम एजेन्सी किंवा फ्रेंचाइजीकडे जावं लागतं. परंतु आता घरबसल्या स्वत: Self KYC करता येणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा App वर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.

सिम कार्ड बदलण्यासाठीही आता डिजीटल KYC करण्यात येईल. नवा नंबर घेणं, टेलिफोन कनेक्शन घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटल असेल.

प्रीपेड ते पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्रीपेड करण्यासाठी प्रत्येकवेळी KYC प्रोसेस करावी लागते. परंतु हे काम आता 1 रुपयांत तेही डिजीटल स्वरुपात होणार आहे.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here