BJP: भाजपची सत्ता आल्यास २०० रुपयांची दारूची बाटली ७० रुपयाला देऊ: भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू

0

विजयवाडा,दि.२९: Somu Veerraju On liquor: निवडणुकीत (Election) राजकीय पक्ष जनतेला अनेक आश्वासने देतात. या आश्वासनात प्रामुख्याने नोकरी, चांगले, रस्ते, पाणी पुरवठा आदींचा समावेश असल्याचे पाहिले, ऐकले असेल. पण कधी दर्जेदार दारू स्वस्त देण्याचे आश्वासन कुठल्या पक्षाने दिल्याचे पहिले नसेल कदाचित. राज्यात निवडणुका जवळ येऊ लागल्या की राजकीय पक्ष मत मिळवण्यासाठी जनतेला अनेक प्रकारची आश्वासनं देऊ लागतात.

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) भाजपा प्रदेशाध्यक्ष सध्या त्यांनी दिलेल्या एका आश्वासनामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की असं काय आश्वासन या नेत्याने दिलंय. तर, भाजपाला (BJP) मत दिल्यास तुम्हाला २०० रुपयांची दारूची (Liquor) बाटली ७० रुपयाला देऊ, असं आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू (BJP President Somu Veerraju) यांनी दिलंय.

भाजपाची (BJP) आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) सत्ता आल्यास ५० रुपये प्रति क्वार्टर बाटली दराने दर्जेदार दारू पुरवठा करण्याचे आश्वासन सोमू वीरराजू (BJP President Somu Veerraju) यांनी मंगळवारी दिले. सध्या दर्जेदार दारूची एक बाटली २०० रुपयांच्या वर विकली जाते. मंगळवारी पक्षाच्या जाहीर सभेत बोलताना वीरराजू यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने विकल्याबद्दल राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात सर्वच बनावट ब्रँड जास्त किमतीत दारु विकतात, तर चांगले आणि लोकप्रिय ब्रँड्स राज्यात उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला १२ हजार रुपये खर्च करत होती. ती रक्कम त्यांना एका योजनेच्या नावाखाली सरकारकडून दिली जाते. राज्यातील एक कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत या एक कोटी लोकांनी भाजपाला मतदान करावे, अशी त्यांची इच्छा आहे. जर, भाजपाला एक कोटी मत मिळाली तर राज्यात ७५ रुपये प्रति बाटली या दराने चांगली दर्जेदार दारू मिळेल आणि महसूल उरला तर ती ७५ ऐवजी ५० रुपये प्रति बाटलीने विकली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारूचे कारखाने असून ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here