Home महाराष्ट्र Uddhav Thackeray: वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव...

Uddhav Thackeray: वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

0

Restrictions in Maharashtra: वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा निर्बंध लावण्याचे (Restrictions in Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आदेश दिले आहेत. देशात ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णांची संख्या जास्त आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हायलेव्हल मिटिंग झाली होती. केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केल्या होत्या. केंद्राने राज्यांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने गुरुवारी राज्य सरकारांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले.

ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यात नाइट कर्फ्यू तसेच स्थानिक पातळीवर गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जावेत, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने लगेचच निर्णय घेत राज्यात नाइट कर्फ्यू लावला आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री 10 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्ससोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.

या बैठकीत गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील, राज्यात नाइट कर्फ्यू लावण्याची गरज आहे का, ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अन्य कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मते जाणून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारीच राज्यात नव्याने गाइडलाइन्स जारी करण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.