Video: पतंग उडवत असताना अचानक व्यक्ती ४० फूट हवेत उडाला

0

दि.23 Social media viral: पतंग (Kite) उडवणे अनेकांना आवडते. भारतात (India) अनेक ठिकाणी पतंग महोत्सवाचे (Kite Competition) आयोजन केले जाते. अनेक देशात पतंग महोत्सवाचे (Kite Competition) आयोजन केले जाते. पतंग उडवण्याच्या छंदामुळे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. पतंग उडवण्यामुळे एक व्यक्ती जखमी झाली आहे.

पतंगबाजी (Kite Flying) करणं अनेक तरुणांना आकर्षिक करतं. परंतु या पतंगामुळे (Kite) एका तरुणाचा जीव टांगणीला लागल्याचं भयानक चित्र पाहायला मिळालं. श्रीलंकेतील जाफना येथील हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगा पतंग (Kite) उडवत उडवत आकाशाच्या दिशेने जात असल्याचं दिसून येते. अनेक वेळ तो पतंगाला असलेल्या मांज्याच्या सहाय्याने हवेत लटकत राहतो. श्रीलंका ट्विटनं या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा याठिकाणी पतंगबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.

पतंग स्पर्धेदरम्यान (Kite Competition) ही अजब घटना घडली. एक व्यक्ती आपल्या टीमच्या बाकी सदस्यांसोबत एक मोठी पतंग रस्सीच्या सहाय्याने हवेत उडवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अचानक त्या रस्सीसोबत तोदेखील जवळपास ४० फूट उंच उडाला. या व्यक्तीला हवेत लटकताना पाहून उपस्थित असणारे सर्वजण हैराण झाले. ही पतंग आणि त्याला बांधलेली रस्सी इतकी मजबूत होती की हा व्यक्ती हवेत लटकला. त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला रस्सी सोडण्यास सांगितले कारण आणखी वर जाऊ नये. त्यानंतर हळूहळू पतंग खाली आली असता व्यक्तीने रस्सी सोडली आणि जमिनीवर आपटला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here