सोलापूर,दि.१८: जुळे सोलापुरातील (Jule Solapur) एका नगरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून दोन मुलींची सुटका केली असून, सुप्रिया बालिगा (वय ५३, रा. जुळे सोलापूर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police Raid On Prostitution Business In Jule Solapur)
परराज्यातील महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करण्यात येत होता. ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करून महिलेला ताब्यात घेऊन तेथील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून जुळे सोलापुरातील वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या व तासाला दीड हजार रुपये घेऊन. तरुणी पुरवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक वर्धन तसेच पोलीस कर्मचारी वाघ, अफरोज शेख, सुभाष गायकवाड, डिगोळे आदींनी केली.