PM Kisan Update : तुम्ही सुद्धा पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहात ? खात्यात पैसे कधी येतील ते जाणून घ्या

0

PM Kisan Samman Nidhi 10th Installment : या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही, त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो.

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 10वा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. तथापि, अद्याप असे कोणतेही अपडेट नाही. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आता पुढील आठवड्यात PM किसान (PM Kisan Samman Nidhi 10th Installment) चा दहावा हप्ता येईल असा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामुळे चर्चेला उधाण

गतवर्षी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता २५ डिसेंबर रोजी देण्यात आला होता. यावेळी 15 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे विविध बातम्यांमधून सांगण्यात येत होते. त्यानंतर 16 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यावर 16 डिसेंबरला 10 वा हप्ता यायला सुरुवात अशी शक्यता वर्तविण्यात आली.

कार्यक्रमात पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीचे फायदे सांगितले

आजचा कार्यक्रम नैसर्गिक शेती या विषयावर होता. या कार्यक्रमात गुजरातमधील सुमारे पाच हजार शेतकरी उपस्थित होते, ज्यांच्यासमोर पीएम मोदींनी नैसर्गिक शेतीचे (Natural Farming) फायदे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमात पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा उल्लेख नव्हता. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही.

यामुळे होत आहे उशीर

पुढील हप्ता मिळण्यास होणारा विलंब विनाकारण नाही. राज्यांनी आरफटी (RFT) वर स्वाक्षरी केली आहे, परंतु निधी हस्तांतरण आदेश (FTO) अद्याप तयार झालेला नाही. एफटीओ (फंड ट्रांसफर ऑर्डर) तयार झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरील स्थितीमध्ये सध्या फक्त आरएफटी दिसत आहे.

eKYC अनिवार्य झाले आहे

यावेळी सरकारने काही बदल केले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही, त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. तुम्हीही तुमच्या खात्यात पैसे येण्याची वाट पाहत असाल, तर लगेच eKYC ची प्रक्रिया पूर्ण करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here