WhatsApp scam alert : WhatsApp वर मेसेज पाठवून हॅकर्स आर्थिक फसवणूक करत आहेत. (WhatsApp scam alert) ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. व्हाट्सॲप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. व्हाट्सॲप (WhatsApp) व्हिडिओ, ऑडिओ तसेच मनोरंजनात्मक मेसेज पाठवले जातात. परंतु WhatsApp चा वापर करताना सतर्क राहण्याची गरज आहे. WhatsApp वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. (WhatsApp scam alert) WhatsApp आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अपडेट देत असतं, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर क्रिमिनल्सच्या एका ग्रुपकडून WhatsApp वर लोकांची फसवणूक केली जात आहे.
हॅलो मॉम, डॅड (Hello Mom, Dad) अशा मेसेजने स्कॅमची सुरुवात होते. UK मध्ये सायबर क्रिमिनल्स अशा प्रकारच्या मेसेजचा वापर करुन लोकांना टार्गेट करत आहेत. त्यानंतर तुमच्या मुलांना पैशांची अतिशय गरज असून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं जातं.
एका व्यक्तीने 50000 डॉलर जवळपास 49,75,683 रुपये गमावले आहे. एका व्यक्तीने फ्रॉड करणाऱ्यांना 3000 पाउंड जवळपास 2,98,540 रुपयांहून अधिक पैसे दिले. त्यांना आपल्या मुलाकडून पैशांची मदत असल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर त्यांनी हे पैसे ट्रान्सफर केले.
हे केवळ यूकेमध्ये नसून भारतातही अशाप्रकारच्या फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. इथे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी मेसेंजरचा वापर करतात.
हॅकर्स एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रुपात तुमच्या चॅट बॉक्समध्ये पॉपअप मेसेज पाठवतात. हा मेसेज तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भाऊ, बहीण, खास मित्र, कुटुंबिया असू शकतो आणि याकडून पैशांची मागणी केली जाते. हा मेसेज खरा असल्याचं समजून पैसे ट्रान्सफर केले जातात आणि काही मिनिटांत बँक अकाउंट खाली होतं. आपल्या जवळच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्याचं वाटतं परंतु अनेकदा ज्याच्या नावाने पैशांची मागणी होते, त्याचं अकाउंट हॅक होऊन तुम्हाला हॅकर्सनेच मेसेज पाठवलेला असू शकतो.
कोणीही पैशांची मागणी केल्यास, ज्या संबंधित व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी झाली आहे, त्याला थेट संपर्क करुन याबाबत माहिती करुन घेणं गरजेचं आहे.