सोलापूर यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

0

सोलापूर,दि.२१: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२०) झाली आहे. तर गुरुवारी (दि.१९) ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गुरुवारी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून, यामध्ये सातत्याने वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

उन्हाळा सुरू झाला असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत तापमान ३४ ते ३५ अंशांदरम्यान स्थिर होते. गुरुवारी मात्र यामध्ये काही अंशांनी वाढ झाली आहे. तर शुक्रवारी परत एकदा तापमानात वाढ झाली असून यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे सोलापूरकरांना आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा पारा साधारणपणे ४२ ते ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here