पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ शेअर करत दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा 

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ शेअर करत दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

मुंबई,दि.19: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोलापूरसह राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग नमन करतो.

त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here